महा भूमि अभिलेख वेबसाईट मध्ये झाले बदल, आता या सुविधा मिळणार आणखी जलद

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या नावावर किती जमीन आहे? आपण वापरत असलेले जमीन आपलेच आहे का की इतर कोणाच्या नावावर आहे? किंवा इतर सरकारी कामांसाठी आपल्याला आपल्या जमिनीचा ८-अ आणि सातबारा उतारा नेहमी लागतो. आणि आपल्या प्रत्येकाच्या जमिनीचा सातबारा उतारा प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे असणे हे आवश्यक असते. आता आपल्या जमिनीचा सातबारा आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने त्याला त्याकडे न जाता सुद्धा काढू शकता. यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन वेबसाईट सुरू केली आहे. Bhumiabhilekh Land Record परंतु यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे वेबसाईट खूप हळूहळू चालत होती. आता यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले आहेत. याबद्दलच आता माहिती घेऊया.

Bhoomi Land record Maharastra : महाराष्ट्र शासनाच्या महाभुमिअभिलेख या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ७/१२, ८ अ, फेरफार, मालमत्ता पत्रक डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी सुद्धा या सुविधा मिळत होत्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट खूप स्लो चालत होती. आता यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले आहेत. आता या नवीन वेबसाईटवर तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला आणि तलाठ्याची सही शिक्का याची गरज नसलेला सातबारा उतारा डाऊनलोड करू शकता.

Bhumiabhilekh Land Record

 

डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मालमत्ता पत्रक साठीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक होय. महाराष्ट्र सरकारनं आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता.

Leave a Comment