आता जमिनीच्या हद्दी बाबतचे वाद मिटणार.! आता एका क्लिकवर मिळणार नकाशा आणि डिजिटल सातबारा

नमस्कार मित्रांनो जमिनीचा नकाशाही डिजिटल मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भौगोलिक ठिकाणानुसार गट नंबर, सर्व्हे नंबरवरील जमिनीचे अक्षांश- रेखांशाच्या आधारे जमिनीचे ठिकाण सहज सांगता येणार आहे. यासोबतच जमीनमालकाच्या सातबाऱ्याला संबंधित जागेचा नकाशा ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे जोडला जाणार आहे.

 

 

👉👉हे सुद्धा वाचा : 10वी पासवर निघाली इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती, येथे करा त्वरित ऑनलाइन अर्ज👈👈

 

 

मशीनच्या साह्याने ई-मोजणी करण्यास सुरुवात केली. त्याआधारे भूमिअभिलेख विभागाने रोव्हर जमिनीचा अक्षांश-रेखांश कळणे शक्य.

काय फायदा होणार?जिओ रेफरन्सिंगमुळे जमिनींचे अचूक अक्षांश रेखांश मिळणे शक्य होणार आहे. सातबारा, नकाशे एकत्रित दीर्घकाळ सहज मिळतील.

नकाशासोबत जमिनीचे अक्षांश-रेखांश मिळणार आहेत. जमिनीच्या हद्दीबा- बतचे वाद-विवाद यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

नकाशा-सातबारा एकत्र

जमिनीचे अक्षांश-रेखांश नकाशावर देण्याची प्रक्रिया भूमिअभिलेख विभागाकडून सध्या सुरु आहे. त्यासोबत एखाद्या भागातील सर्व्हे नंबर किंवा गट नंबरवरील जमिनीचा नकाशाला जमीनमालकाचा सातबारा जोडण्यात येणार आहे. जीआयएस प्रणालीद्वारे सातबारा आणि नकाशा एकमेकांशी जोडण्यात येणार आहे.तसेच ई-नकाशा प्रकल्पाअंतर्गत भूमिअभिलेख विभागाने ३६ जिल्ह्यांतील नकाशाचे

डिजिटायझेशन करण्याचे काम हाती घेतले असून, सहा जिल्ह्यात काम पूर्ण झाले आहे.

Leave a Comment