राज्य शासनाने रेशन संदर्भात आणला नवीन नियम;आता या लोकांना नाही मिळणार रेशन इथे बघा संपूर्ण माहिती

राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आलेला आहे महत्त्वपूर्ण रेशन संदर्भात असणार आहेत.स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य पूर्वी त्या महिन्यात घेतले नसल्यास, पुढील महिन्याच्या सात दिवसांत घेण्याची मुभा होती. मात्र, आता ही मुभा बंद करण्यात आली असून, त्याच महिन्यात धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे उर्वरित धान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे. या संदर्भात अन्न नागरी पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांना परिपत्रक पाठविले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र, लाभार्थी एकाच वेळी हे धान्य घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत धान्य घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे एकदा धान्य घेण्याचे चुकले, तरी पुढील सात तारखेपर्यंत मुदत मिळाल्याने, मागील व चालू महिन्याचे असे दोन वेळचे धान्य प्रकाच वेळी लाभार्थ्याला मिल्त्या-त्या महिन्यातच घ्यावे लागणार आहे.-त्या महिन्यातच आणि मुदतीतच रेशन घेण्याची अंमलबजावणी ) सुरु झाली असून, त्याची कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले.

 

👉 हे सुद्धा बघा या कारणामुळे सुद्धा होणार तुमचे रेशन बंद 👈

Leave a Comment