आजपासून लागू झाले हे 5 नवीन नियम, इथे बघा तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

नमस्कार मित्रांनो एक एप्रिलपासून वर्षांचा चौथा महिना सुरु होत असला तरी नवे आर्थिक वर्ष या दिवसापासून सुरु होत असते. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून वेळोवेळी अर्थकारणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतलेले असतात. या सर्व बाबींची अमलबजावणी १ एप्रिलपासून केली जात असते. या बाबी लक्षात घेऊन आर्थिक नियोजन न केल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

 

 👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! राज्यात यावर्षी पडणार सरासरी पेक्षा जास्त पाऊस👈👈

 

१. विनाकेवायसी फास्टॅग बंद पडणार : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३१ मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एका वाहनासाठी एकापेक्षा अधिक फास्टॅग वापरता येणार नाहीत. केवायसी न झालेले फास्टॅग एक एप्रिलपासून बंद पडतील.

२. पॅन-आधार लिंकिंगची मुदत संपली : केंद्र

सरकारने देशातील सर्व नागरिकांना पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वेळोवेळी यासाठी मुदतवाढही दिली होती. लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही अखेरची मुदत होती. आता यावर दंड भरावा लागेल.

३. भविष्य निर्वाह निधीचा दिलासा : भविष्य निर्वाह

निधी संघटनेचा सदस्य असलेल्या कर्मचान्याला नोकरी सोडून नवी स्वीकारल्यास पीएफ खाते ट्रान्सफरसाठी अर्ज करावा लागत असे. परंतु १ एप्रिलपासून हे अकाऊंट ऑटोट्रान्सफर होणार आहे. यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

४. नव्या टॅक्स रेजीममध्ये प्रवेश : १ एप्रिल २०२४ पासून देशातील सर्व करदात्यांसाठी नवीन करप्रणाली (टॅक्स रेजीम) लागू होणार आहे. सर्वांना या पद्धतीनुसारच करभरणा करावा लागेल. जुनी रेजीम कामय ठेवण्याची मुभा नव्या आर्थिक वर्षात नसेल.

५. ई-विमा खाते सर्वांना बंधनकारक : भारतीय विमा

नियामक आणि विकास प्राधिकरणाने १ एप्रिल २०२४ पासून नवीन विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काढणे बंधनकारक केले आहे. डीमॅट खात्यातील शेअर्सप्रमाणे पॉलिसी विमा खात्यात (इ-इन्शुरन्स अकाऊंट ) ठेवता येणार आहेत.

Leave a Comment