एसबीआय ने होम लोन साठी आणली खास ऑफर; असे मिळवा तात्काळ कर्ज

SBI Home Loan – Yono Mobile Application : योनो ॲप्स द्वारे गृहकर्जासाठी

सर्वप्रथम तुम्हाला एसबीआय बँकेचे YONO हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.

  • त्यानंतर YONO अकाउंट वर लॉगिन करा.
  • होम पेजवर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या Menu वर क्लिक करा.
  • आता कर्ज म्हणजेच लोन्स वर क्लिक करा.
  • पुढे होम लोन Home Loan हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमची जन्मतारीख देऊन पात्रता तपासा.
  • तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती द्या.
  • तुमचे निव्वल मासिक उत्पन्न टाका.
  • त्यानंतर तुमच्या इतर कर्जाची माहिती द्या.
  • आता तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम तपासा आणि पुढे जा.
  • इतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
  • तुम्हाला जर कर्ज मिळणार असेल तर एक रेफरन्स क्रमांक मिळेल. त्यानंतर बँकेकडून एक्झिक्यूटिव्ह तुमच्याशी लवकरच संपर्क करेल.

SBI Home Loan : गृह कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड

कर्जासाठी पूर्णपणे भरलेला अर्ज.

३ पासपोर्ट आकाराचे फोटो

ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – पासपोर्ट / पॅन कार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र

निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – टेलिफोन बिल /विजेचे बिल / पाणी बिल / गॅस बिल.