राज्यात पडणार आज पासून जोरदार पाऊस; या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आणि राज्याच्या हवामानात (Weather Update) मोठा बदल दिसून येत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस

आठवड्याच्या शेवटी राज्याला उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी अवकाळी पावसाची नोंद होणार आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.

 

 

👉👉हे सुद्धा आता : उन्हाळ्यात तुमचं लाईट बिल येईल 30 ते 40 टक्क्यांनी कमी, फक्त वापरा ह्या सोप्या ट्रिक्स👈👈

 

 

राज्यातील काही भागात पिवळा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला आहे.

 

 

 

ऑरेंज अलर्ट कुठे आहे? पिवळा इशारा कुठे आहे?

अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment