शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय.! सर्व शासकीय कामांसाठी आईचे नाव लिहिणे बंधनकारक

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर राज्य शासनाने तो कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र सरकारने जन्म प्रमाणपत्र, शाळेची कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशा सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य केले आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय 1 मे 2024 पासून लागू होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

शिंदे मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय:-

महाराष्ट्रात सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत 300 एकर जागेवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. बीडीडी चाळ आणि झुग्गी रहिवाशांच्या घरांवरील मुद्रांक शुल्कात कपात केली जाईल. अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्यास मान्यता देण्यात आली. मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील कामगारांना शिंदे सरकार घरे देणार आहे.

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी २ योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या २ योजना राबविण्यात येतील. यातील पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन, मिनी ट्रक, ट्रक व ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय, ऑटोमोबाईल, हॉटेल, धाबा सुरु करण्यासाठी ५ लाखांपर्यत कर्ज दिले जाईल. यावरील व्याजदर एनएसटीएफडीसी यांनी निश्चित केल्याप्रमाणे राहील. दुसऱ्या योजनेत पुढील ३ वर्षात ६० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येऊन त्यामधून एकूण १८ हजार आदिवासी लाभार्थींना लाभ देण्यात येईल.

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : रेशन धारकांसाठी आली खुशखबर.! रेशन कार्डधारकांना शिंदे सरकारने दिली ही मोठी खुशखबर👈👈

Leave a Comment