एटीएम मधून पैसे काढताना सावधान..! या लाईटवर ठेवा लक्ष, नाहीतर खाते होईल रिकामे

ATM Cash Withdrawal : एटीएम मधून पैसे काढताना ह्या गोष्टींकडे लक्ष द्या.

एटीएम मध्ये गेल्यावर एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉट कडे नीट बघा. जर तुम्हाला असे वाटत असेल की, एटीएम कार्ड स्लॉट मध्ये छेडछाड झाली आहे, किंवा स्लॉट सैल झाला आहे किंवा आणखी काही गडबड जाणवली, तर त्याचा वापर करू नका.

कार्डस्लॉट मध्ये कार्ड टाकताना त्यात blink होणाऱ्या लाईट कडे लक्ष द्या. त्यामध्ये हिरव्या रंगाची लाईट जळत असेल तर, एटीएम मशीन सुरक्षित आहे. परंतु त्यामध्ये लाल किंवा इतर कोणत्याही रंगाची लाईट येत नसेल, तर त्या एटीएम मशीन चा वापर करू नका. ATM Cash Withdrawal

जर तुम्हाला वाटत असेल की, आपण हॅकरच्या जाळ्यात अडकलो आहोत आणि आज बँकाही बंद आहेत, तर त्यावेळी गोंधळून न जाता पोलिसांची संपर्क साधा. पोलिसांना ही माहिती लवकरात लवकर दिल्यामुळे ते त्यातील फिंगरप्रिंट मिळवु शकतात. आपल्या आजूबाजूला कोणाचे ब्लूटूथ कनेक्शन कार्यरत आहे का? हे देखील आपण पाहू शकता. ज्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे होईल.