आधार कार्ड मोफत अपडेट करायची ही असणार शेवटची तारीख यानंतर लागणार पैसे; इथे करा आधार मोफत अपडेट

आधार अपडेट कसा करायचा

  •  सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
  •  यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा.
  •  आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा.
  •  आता तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  •  पत्ता पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्हाला Proceed to Update Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
  •  आता अपडेट केलेल्या पत्त्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  •  यानंतर एक विनंती क्रमांक तयार होईल.
  •  हा नंबर सेव्ह करा. तुमचा आधार काही दिवसांनी अपडेट होईल.
  •  तुम्ही रिक्वेस्ट नंबरद्वारे तुमच्या आधारची स्थिती तपासू शकता.

 

 शेवटच्या तारखेनंतर किती पैसे भरावे लागतील

जर तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट केले नाही, तर तुम्हाला त्यानंतर ते अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. 14 डिसेंबरनंतर आधार कार्ड अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल. UIDAI ने म्हटले आहे की ही सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर अपडेट केली जाऊ शकते.