या सरकारी बँकेने दिला ग्राहकांना झटका.! कर्जामध्ये केली आता इतक्या रुपयांची वाढ

नमस्कार मित्रांनो एका सरकारी बँकेने ग्राहकांना एक मोठा सरप्राईज दिला आहे.

बँक ऑफ इंडियाने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे.

बँकेने आपल्या कर्जदरात 10 आधार अंकांनी (0.10 टक्के) वाढ केली आहे. त्यामुळे किरकोळ कर्जासह इतर कर्जे महाग होतील. रिझर्व्ह बँक 5 एप्रिल रोजी पतधोरणाचा आढावा जाहीर करणार आहे. बँकेने आधीच व्याजदरात वाढ केली आहे.

 

👉👉हे सुद्धा वाचा : घरकुल योजनेचे पैसे आले इथे बघा तुमचे खात्यात केव्हा होणार पैसे जमा👈👈

 

 

बँक ऑफ इंडियाने शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील. बँकेने सांगितले की “मार्जिन” 0.1 टक्क्यांनी वाढले आहे. हे 2.75 टक्क्यांवरून 2.85 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सध्या रेपो दर ६.५ टक्के आहे. अशा परिस्थितीत रेपो-आधारित व्याजदर 9.35 टक्के असेल. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेनेही प्राइम लोनवरील बेस आणि स्टँडर्ड व्याजदरांशी संबंधित व्याजदरात ०.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. नवीन दर 3 एप्रिलपासून लागू होणार आहेत. दरम्यान, यावेळीही आरबीआयकडून ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बँक रेपो दर कायम ठेवू शकते, असा अंदाज आहे.

Leave a Comment