31 डिसेंबर पर्यंत करा हे काम पूर्ण नाही तर घेता येणार नाही या योजनांचा लाभ, इथे जाणून घ्या पूर्ण माहिती

IDBI स्पेशल FD डेडलाइन

बँकेच्या वेबसाइटनुसार, IDBI बँकेच्या विशेष FD योजनेची ‘अमृत महोत्सव FD’ ची वैधता तारीख 375 दिवस आणि 444 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. गुंतवणूकदार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

इंडियन बँक स्पेशल एफडी डेडलाइन

बँकेच्या वेबसाइटनुसार, इंडियन बँकेच्या ‘इंड सुपर 400’ आणि ‘इंड सुप्रीम 300 दिवस’ विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

बँक लॉकर कराराची अंतिम मुदत

RBI ने सुधारित लॉकर व्यवस्था पद्धतशीरपणे अंमलात आणण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

31 डिसेंबर 2022 पूर्वी एखाद्या व्यक्तीने सुधारित बँक लॉकर करारनामा सबमिट केला असल्यास, त्यांना पुन्हा एकदा अद्यतनित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणे आणि सबमिट करणे आवश्यक असू शकते.