या कारणामुळे विद्यार्थ्यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम

विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना राइट टू गिव्ह अप या बटणाचा वापर विचारपूर्वक करावा. कारण, त्यामुळे सबसिडी सोडावी लागते. मोबाइलवर आलेले ओटीपी पोर्टलवर २ सबमिट करेपर्यंत विद्यार्थ्यांना विचार

करण्याची संधी असते; पण हे बटण नेमके कशासाठी आहे, हेच माहीत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतः अर्ज भरावेत

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरता जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. भरलेली माहिती बरोबर आहे की, नाही याची खात्री करावी.मोबाइल क्रमांक स्वतःचा द्यावा. नियमांची व्यवस्थित माहिती घ्यावी, जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही.