एसटी बस मध्ये गुगल पे फोन पे ने काढता येणार आता ऑनलाईन तिकीट, इथे जाऊन घ्या कसं काढायचं ऑनलाइन टिकिट

नमस्कार मित्रांनो एसटी बस ने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे एसटी महामंडळाने आता प्रवाशांसाठी तिकीट काढण्यासाठी अॅण्ड्रॉइड मशीन वाहकांना दिल्या असून, या मशीनमधील क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना तिकिटाचे पैसे देऊन तिकीट घेता येणार आहे. या सुविधांमुळे प्रवाशांना सुटे पैसे बाळगण्याची चिंता मिटणार आहे.

एसटी महामंडळाने राज्यातील सर्व एसटी विभागात यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सेवा सुरू केली आहे. त्यानुसार जळगाव एसटी विभागातदेखील ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशाचे तिकिटाचे पैसे कट झाल्यानंतरही तिकीट न आल्यास प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबरही एसटी महामंडळाने सुरू केला आहे.

 

👉👉 हे ही बघा : कोणतीही परीक्षा न देता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.मिळणार एक लाख रुपयांपेक्षा जास्त पगार, इथे करा ऑनलाईन अर्ज👈👈

 

गूगल पे, फोन पे वर द्या तिकिटाचे पैसे

एसटीमधील वाहकाकडे आता अॅण्ड्रॉइड तिकीट काढण्याची मशीन देण्यात आली आहे. प्रवाशांकडे जे यूपीआय आयडी आहे त्यावरून अॅण्ड्रॉइड मशीनवरील क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे फोन पे, गुगल पे, पेटीएम आदी यूपीआय आयडीद्वारे देऊ शकतात.

दुसऱ्या टप्प्यात डेबिट, क्रेडिट कार्डही चालणार

अॅण्ड्रॉइड मशीनद्वारे एसटीमध्ये तिकीट काढण्याची प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवाशांना डेबिट, क्रेडिट कार्डचादेखील वापर करून तिकीट काढता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही सेवादेखील लवकरच एसटी महामंडळाकडून सुरु केली जाणार आहे.

 

 हे सुद्धा बघा एसटी महामंडळाने सुरू केली नवीन सुविधा 

Leave a Comment