वीस वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती.! कोणतीही मुलाखत न देता 11000 शिक्षक पदांची होणार मोठी भरती

नमस्कार मित्रांनो भावी पिढीला तयार करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील 11,085 उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या 20 वर्षातील राज्यातील ही सर्वात मोठी शिक्षक भरती आहे. या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 21,678 अध्यापन पदांपैकी 16,799 जागांसाठी मुलाखतीशिवाय नियुक्ती करावी लागली. आता शिक्षण विभागाने 11 हजार 85 उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

प्रक्रिया अशी होती

राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अध्यापनाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकूण 1,123 खाजगी संस्थांनीही नोकरीसाठी विनंती केली. या शाळांमधील 5,728 रिक्त पदांसाठी ही प्रक्रिया पार पडली. याशिवाय, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 12,522 अध्यापनाची पदे रिक्त आहेत. विविध महानगरपालिकांमध्ये 2,951 तर नगरपालिकांमध्ये 477 रिक्त पदांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात एकूण 21,678 रिक्त पदे भरण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पार पडली.

मुलाखतीशिवाय निवडीसाठी संस्थांसाठी १ लाख ३७ हजार ७७३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. तर मुलाखतीसह पदभरतीसाठी संस्थासाठी १ लाख ३३ हजार २७७ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमात १ हजार ५८५ जागा रिक्त राहिल्या आहेत. मराठी माध्यमत ८७० जागा रिक्त असून उर्दू माध्यमाच्या ६४० जागा रिक्त आहेत.

 

👉👉 हे ही बघा : खेळाडूंना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी.! एवढा जागांसाठी निघाली मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज👈👈

Leave a Comment