पुणे महानगरपालिकेत निघाली मोठी बंपर भरती, येथे करा तात्काळ अर्ज

नुकतीच पुणे महानगरपालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. महापालिकेने गेल्या वर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया राबविली होती. तीन वर्षांच्या अनुभवाची अट असतानाही सुमारे 12,500 उमेदवारांनी अर्ज केले. या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा उदंड प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

या भरती प्रक्रियेत 113 पदांपैकी 13 जागा या माजी सैनिकांसाठी राखीव असतील. उर्वरित 100 या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. या विशेष भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी अनुभवाची आवश्यकता नाही. यामुळे नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.