बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली या पदांसाठी मोठी भरती, येथे जाणून घ्या अर्ज कुठे करायचा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी भरती निघालेली आहे, मुंबई महानगरपालिकेत 13 जागांसाठी भरती निघालेली आहे. .या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज ही भरती मुलाखती पद्धतीने होणार आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी पर्यंत असणार आहे. या भरतीची मुलाखती 30 जानेवारी रोजी घेतली जाणार आहे . यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

पालिकेत वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एम.बी.बी.एस. किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. उमेदवाराची महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. उमेदवारांस संगणकाचे आवश्यक ते ज्ञान असावे. यासाठी उमेदवारांना उमेदवारांनी आपले अर्ज आस्थापना कार्यालय, पहिला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई –400077 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

 

👉👉 हे ही बघा : जन्म तारखेसाठी आता आधार हा पुरावा लागणार नाही, लागणार हा नवीन पुरावा,👈👈

Leave a Comment