पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! 5 मार्चपासून अर्ज भरण्यास होणार सुरुवात, इथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

नमस्कार मित्रांनो लोकसंख्येची वाढ आणि राज्यातील अनेक शहरे आणि जिल्ह्यांचा विस्तार, गुन्हेगारी वाढ, नवीन पोलिस ठाण्यांसाठी प्रस्तावांची अपेक्षा आणि सध्याची सामाजिक परिस्थिती, गृह विभागाचे सध्याचे मनुष्यबळ. कमी होत आहे. निवृत्त कर्मचारी, आकस्मिक मृत्यू किंवा स्वेच्छानिवृत्ती यांसारख्या कारणांमुळे पोलिसांची पदेही रिक्त राहतात. दुसरीकडे, सोलापूरसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी सुमारे तीनशे नवीन पोलिस ठाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे पाठवले आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

 

👉👉 हे ही बघा : रेल्वेत निघाली आरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी 4 हजारांचा पेक्षा जास्त जागांसाठी मोठी भरती, इथे करा अर्ज👈👈

 

या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १२ महिन्यांत दुसरी मोठी पोलिस भरती सुरू आहे. पूर्वी 18,000 पदे होती आता 17,000 पदांवर नियुक्ती केली जात आहे. दरम्यान, सध्याची भरती उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये सुरू होईल. तत्पूर्वी, उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत अर्ज भरावे लागतील. प्रथम मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल आणि चाचणीचा निकाल कळल्यानंतर, निवडलेल्या सहभागींसाठी नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण सुरू होईल.

Leave a Comment