आता रेशन दुकानात मिळणार नागरिकांना वायफाय, राज्यातील या सात जिल्ह्यांमध्ये सुविधा PM Vani Yojana

पीएम वाणी योजनेचे महत्त्व, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

पहिल्या टप्प्यात राज्यातील या सात जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग व पालघर या सात जिल्ह्यात ही योजना प्रथमतः सुरू करण्यात येणार आहे. रेशन दुकानाच्या 200 मीटर अंतरापर्यंत या इंटरनेट वायफाय चा परीघ असणार आहे.

पीएम वाणी योजनेद्वारे देशातील नागरिकांना इंटरनेटशी जोडले जाऊ शकते. त्यामुळे वाढत्या डिटेल अर्थव्यवस्थेत लोकांचे उत्पन्न वाढेल आणि लोकांची जीवनशैली सुधारेल योजनेमाचे मुख्य उद्दिष्टे आहे.

या योजनेचा रेशन दुकानदारांना फायदा होणार आहे. म्हणजेच या योजना अंतर्गत इंटरनेट वापरणाऱ्यांना दररोज एक ते दीड जीबी डेटा मिळणार आहे. त्यासाठी महिन्याकाठी माफक खर्च येणार आहे. याचा लाभ सर्वांनाच होणार आहे. तसेच रेशन दुकानदारांनाही या योजनेचा फायदा होणार असून दुकानदारांना त्यांचे उत्पन्न आणखीन वाढण्यासाठी एक साधन उपलब्ध होईल.

 

PM वाणी सरकारची अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करून बघा