शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार देणार आता वर्षाला 8 हजार रुपये | Pm Kisan Yojana

अंतरिम अर्थसंकल्प सादरीकरण

1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालये आणि विभागांशी सल्लामसलत सुरू केली आहे.