या लोकांचे पॅन कार्ड झाले कायमचे बंद, इथे बघा तुमचे सुरू आहे का पॅन कार्ड

नमसकार मित्रांनो ११.५ कोटी पॅन कार्ड अंतिम मुदतीपर्यंत आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाला दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख या वर्षाच्या सुरुवातीला ३० जून रोजी संपली होती. १ जुलै २०१७ नंतर ज्या पॅन कार्डधारकांना त्यांचे कार्ड मिळाले, त्यांचे आधार त्यांच्याशी आपोआप लिंक झाले. असे असले तरी, त्या तारखेपूर्वी पॅन कार्ड मिळाले होते त्यांनी ते लिंक करणे आवश्यक होते. भारतातील ७०.२४ कोटी पॅन कार्डधारकांपैकी ५७.२५ कोटी कार्डधारकांनी त्यांचे पॅन कार्ड आधारशी जोडले आहे. ११.५ कोटी निष्क्रिय केले गेले आहेत. १००० रुपये दंड भरून पॅन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दंडाची रक्कम नव्या कार्डच्या शुल्काच्या तुलनेत १० पट जास्त असल्याचे म्हटले आहे.

 

लिंक तपासण्यासाठी काय कराल? इथे क्लिक करून बघा

Leave a Comment