10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मुंबई कस्टम मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.! मिळणार 60 हजार पेक्षा जास्त पगार, येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाचे व महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. मुंबई कस्टम्स अंतर्गत ‘कर्मचारी कार चालक’ पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २० फेब्रुवारी २०२४ च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर आपण अर्ज पाठवणे आवश्यक असेल. या पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे व कामाचे ठिकाण हे मुंबई असेल.

पदाचे नाव: कर्मचारी कार चालक

एकूण जागा: २८ जागा

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा: १८ – २७ वर्षे दरम्यान

अर्ज पद्धती – ऑफलाईन पध्दतीने

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001

 

👉👉 हे ही बघा : आजपासून मिळणार 10वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट, इथे बघा कसं करायचं हॉल तिकीट डाउनलोड👈👈

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२४ असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

,कर्मचारी कार चालक पदासाठी पात्रता निकष हे शैक्षणिक व अनुभव दोन्ही स्वरूपात आहेत. उमेदवाराचे किमान १० वीचे शिक्षण पूर्ण झालेले असावे तसेच त्याच्यांकडे मोटार कारसाठी अधिकृत वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. मोटार चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असायला हवा.

कर्मचारी कार चालक पदावर कायमस्वरूपी निवड होण्यापूर्वी किमान दोन वर्षांचा कालावधी प्रोबेशनवर (कंत्राटी) काम करावे लागेल. द्वितीय श्रेणीतील या पदासाठी पगार किमान १९,००० ते कमाल ६३,२०० पर्यंत असू शकतो.

 

👉 या भरतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी ती क्लिक करा 👈

Leave a Comment