शिंदे सरकारने घेतला निर्णय.! कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना होणार सुरू, इथे बघा पूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारकडून सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरकारने जाहिरात दिलेल्या आणि त्यावेळी निवड केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

या संदर्भात शासन निर्णय हा जाहीर घेण्यात आला आहे. ”३१.१०.२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामध्ये सांगण्यात आले होते की ”केंद्र शासनाने संदर्भ क्र. २ येथील ३.०३.२०२३ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे. ज्याची जाहिरात / भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच २२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर १.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात /अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेची बाब विचाराधीन होती. याबाबत मंत्रीमंडळाने ४ जानेवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती. तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला या लेख आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : सरकारने दिली महिलांना खुशखबर.! आता या महिलांना सुद्धा मिळणार पेन्शन👈👈

Leave a Comment