आता मिळणार नवीन रेशन कार्ड फक्त 30 दिवसात; इथे करा लवकर अर्ज

आवश्यक कागदपत्रे

  •  उत्पन्न दाखला
  •  रहिवासी दाखला (सातबारा उतारा, लाईट बिल)
  • आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे)
  •  शेजारचे रेशनकार्ड झेरॉक्स स्वाक्षरी
  • १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन

 

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता प्रत्येक गावकऱ्याला आणि शहरातील रहिवाशांना ऑनलाइन शिधापत्रिका मिळणार आहे. त्यांनी www.rcms.mahafood.gov.in वर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे किंवा तसे करण्यासाठी जवळच्या ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा सरकारी सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

 

३० दिवसांत मिळणार रेशनकार्ड

शिधापत्रिका काढण्यासाठी आता कोणाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन सुविधा केंद्रावरून अर्ज केल्यास ३० दिवसांत त्या व्यक्तीला नवीन रेशनकार्ड किंवा विभक्त रेशनकार्ड मिळणार आहे.