शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांना देणार शिंदे सरकार 5 लाख रुपये पर्यंत कर्ज

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने या नागरिकांसाठी घेतला अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय तर तो निर्णय कोणता घेतलेला आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी २ योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या २ योजना राबविण्यात येतील. यातील पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन, मिनी ट्रक, ट्रक व ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय, ऑटोमोबाईल, हॉटेल, धाबा सुरु करण्यासाठी ५ लाखांपर्यत कर्ज दिले जाईल. यावरील व्याजदर एनएसटीएफडीसी यांनी निश्चित केल्याप्रमाणे राहील. दुसऱ्या योजनेत पुढील ३ वर्षात ६० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येऊन त्यामधून एकूण १८ हजार आदिवासी लाभार्थींना लाभ देण्यात येईल.

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.! शेतकऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयापर्यंत कर्ज फक्त दहा मिनिटात, इथे मिळवा कर्ज👈👈

Leave a Comment