नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज; सरकार भरणार तुमचं व्याज

असा करा ऑनलाइन अर्ज

अर्जदाराने ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या https:// udyog.mahaswayam.gov.in वर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला सिस्टीमद्वारे एसएमएस व ई-मेलद्वारे सूचना प्राप्त होईल. स्थळ पाहणीसाठी लाभार्थी वेब पोर्टलद्वारे दिनांक व वेळ स्वतः निश्चित करेल. त्यानुसार संबंधित जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयामार्फत प्रस्तावित व्यवसायाच्या जागेची, वास्तव्याच्या स्थळाची पाहणी तसेच जामीनदाराची पडताळणी करण्यात येईल.

कोणाला मिळणार कितीपर्यंत कर्ज

वैयक्तिक :

१० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी ५ वर्षांसाठी निर्धारित केला गेला आहे.

गट प्रकल्प :

आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

महामंडळामार्फत साडेचार लाख रुपयांच्या व्याज मर्यादेत परतावा देण्यात येतो. हा व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त ७ वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त दर साल दर शेकडा १२ टक्के इतका आहे.

लाभार्थ्याने कर्ज प्रकरण अर्जाच्या तीन प्रतींत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सदर कर्ज प्रकरणांची पडताळणी करून किफायतशीर असल्याचे तपासून

स्थळ पाहणी अहवाल सादर केला जातो.

नंतर प्रकरणाची एक प्रत बँकेकडे शिफारस करण्यासाठी पाठविली जाते. बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकरण महामंडळाकडे पाठविले जाते.