फोन हरवल्यास GPay, PhonePe आणि Paytm कसे ब्लॉक करायचे? इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, तुमचा फोन हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर, आपल्याला चिंता असते की, आपल्या फोनमध्ये असलेल्या गुगल पे, फोन पे पेटीएम चा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? या सर्व सुविधा ब्लॉक कराव्या हा एकच यावर पर्याय असतो. आपण या सुविधा आपण कशा ब्लॉक कराव्या यासंबंधीची सर्व माहिती आपण या लेखामार्फत घेणार आहोत. तुमच्या फोनमध्ये PhonePe, Google Pay आणि Paytm लॉगिन सारखी UPI आधारित पेमेंट सेवा आहे. अशा परिस्थितीत कोणीतरी त्याचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. Block PhonePe अशा परिस्थितीत तुम्ही चोरी झालेल्या फोनमधील तुमच्या सर्व UPI आधारित सेवा बंद करू शकता. त्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पेटीएम अकाऊंट

फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तुमचं Paytm account तात्पुरतं ब्लॉक करता येतं. त्यासाठी पद्धत खूप सोपी आहे.

प्रथम Paytm Payments Bank हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.

यानंतर, फोन हरवण्याचा पर्याय निवडा.

वेगळा नंबर टाकण्यासाठी पर्याय निवडा आणि तुमच्या हरवलेल्या फोनचा नंबर टाका. नंतर सर्व उपकरणांमधून लॉग आउट करणे निवडा. Block PhonePe

नंतर Paytm website वर जा आणि 24×7 मदत निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Report a Fraud निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा. त्यानंतर कोणत्याही समस्येवर क्लिक करा आणि नंतर तळाशी असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा.

यानंतर, वापरकर्त्याला डेबिट/क्रेडिट कार्डने खाते सत्यापित करावे लागेल.

त्यानंतर पेटीएम तुमचे खाते सत्यापित करेल आणि ब्लॉक करेल .

 

👉 हे सुद्धा बघा फोन पे गुगल प्ले कशाप्रकारे बंद करायचे 👈

Leave a Comment