या’ 5 बँका सर्वात कमी व्याजदरावर देत आहेत गृहकर्ज, इथे बघा संपूर्ण व्याजदर

Home Loan Rates : ‘या’ 5 बँका सर्वात कमी व्याजदरावर देत आहेत गृहकर्ज, संपूर्ण यादी पहा

१- स्टेट बँक ऑफ इंडिया-(State Bank of India) – एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असून ही बँक वार्षिक 8.40% दराने होमलोन देत असून यामध्ये 0.17% प्रक्रिया शुल्काचा समावेश आहे. एवढेच नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोनवर 0.65 टक्यांची सूट देखील देत आहे.Home Loan Rates या सवलतीचा लाभ 31 डिसेंबर 2023 पर्यंत घेता येणार आहे.

२- बँक ऑफ बडोदा- (Bank Of Baroda) – सणासुदीच्या कालावधीमध्ये बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ‘बीओबी के संग फेस्टिवल की उमंग’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली होती व ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. या अंतर्गत बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आकर्षक व्याजदरामध्ये होम लोन तसेच पर्सनल लोन, एज्युकेशन लोन व कार लोन देखील मिळणार आहे.

३- पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी बँक-(Punjab National Bank)- तुम्हाला देखील होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचा देखील पर्याय निवडू शकतात. पंजाब नॅशनल बँक 8.40 ते 10.60% व्याजदर आकारात आहे.Home Loan Rates

४- आयसीआयसीआय बँक-(ICICI BANK)- आयसीआयसीआय बँक ही खाजगी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बँक असून बँकेच्या माध्यमातून देखील बँकेच्या ग्राहकांना होम लोन दिले जाते. जर तुमचा सिबिल स्कोर साडेसातशे ते आठशे दरम्यान असेल तर आयसीआयसीआय बँक ग्राहकांसाठी नऊ टक्के व्याजदराने होम लोन देत आहे.

५- इंडियन बँक-( Indian Bank) – इंडियन बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बँक असून होम लोनकरिता या बँकेचा पर्याय देखील फायद्याचा ठरू शकतो. इंडियन बँक 8.50% ते 9.90% या व्याजदराने होम लोन देत असून यामध्ये 0.23% प्रक्रिया शुल्क असणार आहे.Home Loan Rates