लेकीच्या भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली का? सरकारने सुरू केली ही नवीन योजना, इथे करा ऑनलाईन अर्ज

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये

मुलगी जन्मल्यापासून १० वर्षापर्यंत सुकन्या खाते मुलीच्या नावावर उघडता येते. एका मुलीच्या नावे एकच खाते उघडू शकता. सदरील खाते उघडण्यासाठी मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक. फक्त २५० रुपये जमा करून सदरील खाते उघडता येते.

खाते उघडल्यापासून २१ वर्षापर्यंत एका आर्थिक वर्षामध्ये सरकारद्वारा वेळोवेळी निश्चित केलेल्या चक्रवाढ पद्धतीने व्याज देय असेल. १८ वर्ष पूर्णे केल्यानंतर किंवा इयत्ता दहावी

उत्तीर्ण झाल्यानंतर, उच्चशिक्षण

किंवा विवाह या कारणांसाठी ५० टक्के रक्कम काढता येते. खाते उघडल्यापासून २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केलेली रक्कम ही आयकर विभागाच्या ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.

नागरिकांनी आपल्या लाडक्या मुलीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडावे.