आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनांची यादी बघा आता मोबाईलवर | Grampanchayat Yojana

ग्रामपंचायत मधील सरकारी योजनाची माहिती, gramapanchayat Scheme

साईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Government of India, ministry of rural development, department of rural development या अंतर्गत महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजेच मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर याल.

या ठिकाणी तुमच्यासमोर REPORTS नावाचे एक पेज ओपन होऊन येईल यामध्ये State* : या पर्यायासमोर MAHARASHTRA लिहिलेले आहे का म्हणजेच आपल्याच राज्यची वेबसाईट ओपेन झालेली आहेका याची खात्री करून घ्या. नंतर तुम्हाला फायनान्शिअल इयर तुमचा जिल्हा,ब्लॉक आणि पंचायत यासंबंधीची माहिती भरावयाची आहे.

सर्वप्रथम तुम्हाला Financial Year : फायनान्शिअल इयर म्हणजे ज्या वर्षीची कामे जाणून घ्यायची आहे ते वर्ष निवडायचे आहे.

यानंतर District* : डिस्ट्रिक्ट या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.

Block*: ब्लॉक समोर रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.

आणि Panchayat* : पंचायत या पुढील रकान्यांमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे/गावाचे नाव निवडायचे आहे.

ही सर्व माहिती अचूकपणे निवडल्यानंतर तुम्हाला प्रोसेड या बटनावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमच्यासमोर GRAM PANCHAYAT REPORT (ग्रामपंचायत रिपोर्ट) नावाचे पेज ओपन होईल येथेच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व कामांचा तपशील घेऊ शकता.