ग्रामपंचायत बांधकामासाठी मिळणार आता 100% अनुदान, इथे जाणून घ्या पूर्ण माहिती | Grampanchayat Anudan

नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न हे अतिशय कमी असल्याने, अनेक ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसते. त्यामुळे एकतर भाडे तत्त्वावर किंवा मग खासगी जागेवर ग्रामपंचायतींना कार्यालय सुरू करावे लागते. प्रत्येक ग्रामपंचातीला स्वत:ची इमारत असावी, यासाठी राज्य शासनाकडून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविली जात असून, या योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी दिला जात आहे.राज्य शासनाने या योजनेची मुदतदेखील वाढविली आहे.

 

👉👉 हे ही बघा : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी बंपर भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

काय आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना?

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून निधी दिला जातो. या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि १ ते २ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २० लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे.

अनुदान प्रक्रिया

आधी किती मिळायचे? बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेसाठी आधी एकूण निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत दिली जात होती. तर, १० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला

स्वनिधीतून उभारणे आवश्यक होते.

आता किती मिळणार अनुदान?

ग्रामपंचायत स्वनिधीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे. यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता असेल तर तो इतर योजनांतून मिळेल.

 

👉 इथे क्लिक करून बघा योजनेची मुदत केव्हा पर्यंत आहे 👈

Leave a Comment