तुमच्या मुलीला वयाच्या 21 व्या वर्षी मिळतील 64 लाख रुपये, या सरकारी योजनेत खाते उघडा

तुम्हाला वयाच्या 21 व्या वर्षी 64 लाख रुपये मिळतील.

तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास, ही रक्कम एका वर्षात 1.5 लाख रुपये होईल. या रकमेवर कोणताही कर लागणार नाही. जर आपण मॅच्युरिटीवर व्याजदर 7.6 टक्के घेतला तर तो गुंतवणूकदार आपल्या मुलीसाठी मॅच्युरिटी होईपर्यंत मोठा फंड तयार करू शकतो. जर गुंतवणूकदाराने त्याची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम काढली तर मॅच्युरिटी रक्कम 63 लाख 79 हजार 634 रुपये होईल. यामध्ये गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम 22,50,000 रुपये असेल. याशिवाय व्याजाचे उत्पन्न 41,29,634 रुपये असेल. अशाप्रकारे, तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास, तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तुम्हाला सुमारे 64 लाख रुपये मिळतील.