शेततळे उभारण्यासाठी सरकार देत आहे ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान; ऑनलाइन अर्ज झाले सुरू; इथे करा अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रहो, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर शेततळ्याच्या Shet Tale Anudan Yojana अनुदानाच्या रकमेत ५० टक्क्यांनी वाढ करून ती ७५ हजार रुपयांपर्यंत करण्यात आलेले आहे. आजच्या या भागामध्ये याच विषयासंबंधी माहिती घेणार आहोत तरी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

शेतकरी बांधवांनो, आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हे माहिती नसते की, शेततळे उभारण्यासाठी सरकारकडून किती अनुदान मिळते. नुकतेच सरकारने शेततळे उभारण्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत त्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते. यासंबंधीचे महत्वाची माहिती दिली आहे.

Shet Tale Anudan Yojana योजनेअंतर्गत शेततळे उभारण्यासाठी कोणत्या शेतकरी पात्र आहेत? पात्रतेचे निकष काय आहेत? आणि यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

शेततळे योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान दीड एकर जमीन असणे अनिवार्य आहे.

अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून किंवा शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. Shet Tale Anudan Yojana

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड ही महाडीबीटीच्या पोर्टल द्वारे कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे करण्यात येते.

 

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेततळे अनुदान योजना 2023 : काय आहे योजना जाणून घेऊया?

महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यातील बहुतांशी शेतजमीन ही कोरडवाहू असल्यामुळे ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. त्याचबरोबर सिंचन सुविधा अभावी पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खूप जास्त ताण पडल्यास पिके देखील नष्ट होतात. यामुळे शेतकऱ्यांस आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

शाश्वत सिंचनाचा स्रोत म्हणून शेततळ्याकडे पाहतात. म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या शेतीला शाश्वत सिंचनाचा स्रोत उपलब्ध असावा, यासाठी शेतकरी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकरी शेततळ्यांचे खोदकाम सुरू करतात. तसेच उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणावर शेततळ्यासाठी खोदकाम सुरू करतात. परंतु या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अनुदान मिळावं अशी शेतकऱ्यांची इच्छा असते. Shet Tale Anudan Yojana

याच धरतीवर ३० मीटर x २५ मीटर x ३ मीटर तसेच ३० मीटर x ३० मीटर x ३ मीटर या दोन्ही श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी आता ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. यापूर्वी या अनुदानाची रक्कम ५० हजार रुपयांपर्यंत होती..

परंतु हे अनुदान मिळण्यापूर्वी यामध्ये एक मर्यादा घालण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुदान जमा करताना शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्याचा वापर करावा लागणार आहे. शेततळ्यांमुळे राज्यात नगदी शेतीमाल उत्पादनाला चालना मिळाली आहे विशेषतः फळे व भाजीपाला उत्पादनात शेतकऱ्यांची भूमिका मोलाची ठरली आहे.

 

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment