मोदी सरकारने कामगारांना दिली आनंदाची बातमी.! मोदी सरकारने कामगारांच्या मजुरीत केली इतक्या रुपयांची वाढ

नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) काम करणाऱ्या कामगारांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या पगारात 3 ते 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या संदर्भातील अधिसूचना गुरुवारी (28 मार्च) जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पगारवाढ करण्यात आली आहे. मनरेगा कामगारांचे नवीन वेतन 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.

नवीन दरांनुसार कामगारांना आता सर्व राज्यांमध्ये अधिक वेतन मिळेल. गोव्यात पगारात सर्वाधिक वाढ झाली आहे. गोव्यात सर्वाधिक 10.56 टक्के वाढ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात केवळ 3.04 टक्के वाढ झाली आहे.

बिझनेस स्टँडर्डने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने कामगार दर अधिसूचित करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात सध्या आचारसंहिता लागू आहे. आयोगाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर मंत्रालयाने तातडीने पगारवाढीची अधिसूचना जारी केली.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मनरेगा कामगारांचा मजुरी दर 221 रुपयांवरून 243 रुपये प्रतिदिन झाला आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मजुरांची रोजची मजुरी 230 रुपयांवरून 237 रुपये झाली आहे.

हरियाणा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मनरेगा कामगारांचे दर 7 टक्क्यांनी वाढले आहेत. आता त्यांची रोजची मजुरी 267.32 रुपयांवरून 285.47 रुपये झाली आहे.

गोव्यातील कामगारांना पूर्वी 322 रुपये प्रतिदिन मिळत होते, ते आता वाढून 356 रुपये झाले आहे.

कर्नाटकात मनरेगाचा दर 349 रुपये झाला आहे, जो पूर्वी 316 रुपये प्रतिदिन होता.

 

👉 हे ही बघा : तुमचे सुद्धा वीज जास्त येते का? आतापासून घरबसल्या सुरू करा विजेची बचत, फॉलो करा फक्त हे सोप्या पद्धत👈

Leave a Comment