शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! लोकसभा निवडणूक आधी मोदी सरकारन देणार शेतकऱ्यांना खुशखबर

नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यापासून ते उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यापर्यंत अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

एलपीजीसह सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता आहे? शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले जाऊ शकते.

डीएमध्ये ४ टक्के वाढ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. ही घोषणा झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

शेतकऱ्यांना मिळणार भेट

केंद्र सरकार देशातील अन्नदाता शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी सरकार एमएसपीवर निर्णय घेऊ शकते. किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 285 रुपयांनी वाढू शकते. सरकारच्या निर्णयानंतर ज्यूटचा एमएसपी 5,335 रुपये असेल. सध्या तागाचा एमएसपी 5,050 रुपये प्रति क्विंटल आहे.

 

👉👉 हे ही बघा : कोणतीही परीक्षा न देता मिळवा थेट सरकारी नोकरी, इथे करा लगेच ऑनलाइन अर्ज👈👈

Leave a Comment