रेशनधारकांसाठी आली खुशखबर.! गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिंदे सरकार देणार या वस्तू

नमस्कार मित्रांनो शिंदे सरकार लवकरच आनंदाचा शिधा वाटप करणार आहे तर हा आनंदाचा शिधा केव्हा मिळणार जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा. राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल.

राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा”देण्यात येईल.

यासाठी येणाऱ्या 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

 

👉👉 हे ही बघा : पी एम किसानचे 16व्या हप्ताचे पैसे मिळाले नाही, 31 मार्च पर्यंत करा हे काम लगेच येणार खात्यावर पैसे👈👈

Leave a Comment