शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पैसे

नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाल्या नुसकानग्रस्त भरपाई चे पैसे जमा तर ते पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बघण्यासाठी संपूर्ण नक्की लेख नक्की बघा.

नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच भरपाईची रक्कम दिली जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. यापावसात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, केळी, पपई, कापूस, मिरची, कांदा या पिकांचे नुकसान झाले होते. तब्बल पाच हजार ७५६ शेतकऱ्यांच्या सुमारे दोन हजार ८५१ हेक्टर आर. पेक्षा

जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले होते.

पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर शासनाने त्यासाठी चार कोटी ९५ लाख ४३ हजार रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले. आतापर्यंत चार हजार ३४३ शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार २७४ रुपये ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

 

👉👉 हे ही बघा : कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर.! 2024 मध्ये या बँका देणार सर्वात स्वस्त कर्ज👈👈

Leave a Comment