शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपयांचा बोनस

शेतकऱ्यांना केली ४४ हजार कोटींची मदत

महायुती सरकारने जून २०२२ पासून आतापर्यंत ४४ हजार २७८ कोटींची मदत दिली.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकयांना अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत १४ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५,१९० कोटी रुपये जमा केले

 

👉👉 हे ही बघा : फोन मध्ये इंटरनेट नाही? तरी करता येणार इंटरनेट शिवाय यूपीआय पेमेंट, इथे जाणून घ्या संपूर्ण प्रकिया👈👈

 

धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपयेरुपयांचा बोनस जाहीर. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याने १,७२० कोटी रुपये टाकले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधिमंडळात धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली. धानाला बोनस मिळावे म्हणून खा. प्रफुल्ल पटेल यांनी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.