मुलींना 18 वर्ष पूर्ण होताच मिळणार 75 हजार रुपये; इथे बघा अर्ज कुठे करायचा संपूर्ण प्रक्रिया

एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही मिळेल लाभ.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

 

योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे…

  • लाभार्थी मुलीचा जन्म दाखला
  • वार्षिक उत्पन्न एक लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थी व पालकाचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट)
  • राष्ट्रीयीकृत बॅंकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत बंधनकारक)
  • लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड)
  • माता किंवा पित्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
  • अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा (अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र बंधनकारक)