लेक लाडकी योजनेअंतर्गत पालकांना मिळणार एक लाख पाच हजार रुपये, इथे करा अर्ज

वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असावे, मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा, एका अथवा दोन मुलींना, त्याचप्रमाणे एक मुलगा, एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये जन्मल्यास मुलींना योजनेचा लाभ मिळेल. पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना पाच टप्प्यात एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

एकूण मिळणार १ लाख ५ हजार

कौटुंबिक परिवारात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार, पहिलीत गेल्यावर ६ हजार, सहावीत गेल्यावर ७ हजार, अकरावीत गेल्यावर ८ हजार, अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार, असे १ लाख ५ हजार रुपये मिळणार आहेत.