ग्रामपंचायत जायचे कशाला आता घरबसला मिळवा दाखले, करा फक्त हे ॲप डाऊनलोड

नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून आता ग्रामपंचायतीत पेपरलेस संकल्पना सुरू केली आहे. त्या अंतर्गत नागरिकांना ग्रामपंचायतीमधून काढण्यात येणारे विविध दाखले थेट घर बसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटीझन मोबाईल अॅप तयार करण्यात आले. प्रशासनाकडून अनेकवेळा आवाहन करून देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून सकारात्मक काम केले जात नसल्याचे चित्र आहे. या अॅपमुळे नागरिकांना घरबसल्या आवश्यक कागदपत्र काढता येणार आहेत. तसेच करभरणा ऑनलाईन झाल्यास, ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता देखील येते.

 

👉👉 हे ही बघा : आता मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करावे लागणार का? सरकारकडून आली नवीन अपडेट👈👈

 

ॲप कसे इन्स्टॉल कराल?

प्ले स्टोअर वरून अॅप डाउनलोड केल्यावर त्यात नाव, लिंग, जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती भरुन नोंदणी करावी.

त्यानंतर संबंधित व्यक्तीला युजर नेम व पासवर्ड मिळणार आहे. त्यानंतर विविध दाखले व प्रमाणपत्रांसाठी या अॅपमधून अर्ज करता येणार आहे.

अर्ज थेट संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात दाखल होतील.

अनेक ग्रामपंचायतींना विसर या अॅपव्दारे कागदपत्रे काढण्याची सुविधा अनेक ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे.

 

 👉 इथे क्लिक करून बघा कोणते दाखले मिळणार 👈

Leave a Comment