अखेर ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, हे तालुके आहे पात्र, मिळणार हेक्टरी 25 हजार रुपये

राज्यातल्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातील मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी Maharashtra Drought परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 42 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे समजले आहे. यामध्ये लक्षणीय परिणाम झालेल्या 40 तालुक्यांची निवड करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत या तालुक्यांसाठी दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.

 

जिल्हानिहाय दुष्काळ जाहीर झालेले ४० तालुके

■ नंदुरबार : नंदुरबार

■ जळगाव : चाळीसगाव

■ जालना : भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा

■ छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर

 

Maharashtra Drought

■ नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला

■ पुणे: पुरंदर, सासवड, बारामती

■ बीड : वडवनी, धारूर, अंबाजोगाई

■ लातूर : रेणापूर

■ धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा,

■ सोलापूर : बार्शी, माळशिरस, सांगोला.

■ धुळे : सिंदखेडा

■ बुलढाणा : बुलढाणा, लोणार

■ पुणे : शिरूर घोड नदी, दौंड, इंदापूर

■ सोलापूर : करमाळा, माढा

■ सातारा : वाई, खंडाळा

■ कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज

■ सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज