अखेर ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, हे तालुके आहे पात्र, मिळणार हेक्टरी 25 हजार रुपये

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने अनेक ठिकाणी पाण्याची तसेच गुरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल. Maharashtra Drough

आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

 

👉👉 हे ही वाचा : तुम्ही सुद्धा बँकेत जात आहेत कर्ज घेण्यासाठी? तर ही बातमी नक्की वाचा👈👈

 

Maharashtra Drough: या सवलती दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणार –

1) शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार

2)पीक कर्जाचे पुनर्गठन होणार Maharashtra Drough

3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती येणार

4) जवळ जवळ 33.5% कृषिपंपांच्या चालू वीज बिलात सूट मिळणार

5) शालेय,व तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी होणार

6)’रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार

7) पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आवश्यक तेथे टँकर्स मिळणार

8)शेतकऱ्यांच्या शेती पंपांना अखंडित वीज मिळणार

 

दुष्काळ पडलेल्या शेतकऱ्यांची यादी पहा इथे क्लिक करा

Leave a Comment