आता रेशन कार्ड वर मिळणार मोफत साडी; इथे बघा सविस्तर माहिती

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी, २४ लाख कुटुंबांना लाभ

रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडी ही अंत्योदयमिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप होणार आहे.

 

₹३५५ एका साडीची किंमत आहे.

 

राज्य शासनाकडून दिला जाणार निधी 

| राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे.

या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

५ वर्षांसाठी वस्त्रोद्योग विभागाची योजना

 

 इथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार मोफत साडी रेशनवर

Leave a Comment