पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी, इथे तपासा यादी मध्ये तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी

विमा कंपन्या राजी! पावसाच्या खंडामुळे २५% लाभ

पंतप्रधान खरीप पीक योजनेंतर्गत २१ दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे, तर चार जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहेत..

 

२८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली होती. कृषी विभागाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले होते.

वाशिमबाबत संभ्रम

विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यातील बुलढाणा, बीड व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली असून, अधिसूचना मान्य करत संबंधित विमा त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यांतील कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्याबाबत संभ्रम कायम आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोण कोणत्या जिल्ह्यांना मिळणार अनुदान 👈

Leave a Comment