हा व्यवसाय सुरू केल्यास दिवसाला कमवाल पाच हजार रुपये, इथे जाणून घ्या व्यवसाया बद्दल संपूर्ण माहिती

Unique Business Ideas in India: कोणता आहे तो बिजनेस?

आम्ही ज्या बिजनेस बद्दल बोलत आहोत तो आहे लादी पाव बनवण्याचा व्यवसाय. लादी पाव किंवा नरम पाव बनवण्याचा हा व्यवसाय आजही मार्केटमध्ये चांगली कमाई करून देत आहे. खरंतर लादी पावची मागणी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. या पावची मागणी छोट्याशा हॉटेल्समध्ये आणि मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये देखील पाहायला मिळते.

व्यवसाय कसा सुरू कराल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही मशीनची गरज लागेल. यासाठी तुम्हाला चांगली जागा देखील लागणार आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कणिक बनवण्याचे यंत्र, बेकिंग ओव्हन, ट्रे, कंटेनर इत्यादी यंत्रांची गरज भासणार आहे.

याशिवाय या व्यवसायासाठी कच्चा माल म्हणून मैदा, मीठ, साखर, बेकिंग पावडर, यीस्ट पावडर या वस्तू देखील लागणार आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 400 ते 500 चौरस फूट जागा लागेल. यासाठी तुम्हाला किमान ३ ते ४ कर्मचारी कामावर ठेवावे लागतील.

व्यवसायाची नोंदणी करावी लागेल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. यासाठी कंपनीची नोंदणी करावी लागेल. एवढेच नाही तर हा व्यवसाय FSSAI कडे नोंदणी करावा लागेल आणि एफ एस एस आय कडून परवाना देखील काढावा लागणार आहे. यासाठी व्यापार परवाना मिळवावा लागेल.

कसा तयार होतो पाव

तुम्ही जर पाव बनवण्याच्या मशीन मध्ये 100 किलो पीठ ठेवले तर तुम्हाला दोन किलो मीठ, एक किलो साखर, 100 ग्रॅम बेकिंग पावडर, एक किलो यीस्ट पावडर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकावे लागेल. पीठ तयार झाल्यावर त्याचे छोटे गोळे तयार करा. हे गोळे बेकिंग ओवन मध्ये ठेवून पाव तयार करा. Unique Business Ideas in India

किती खर्च करावा लागू शकतो?

एका मीडिया रिपोर्ट नुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास सहा लाख रुपयांचे भांडवल लागू शकते. यामध्ये पाच लाख रुपये फिक्स कॅपिटल लागेल तर एक लाख रुपये खेळते भांडवल लागणार आहे.

या व्यवसायासाठी पाव मेकिंग मशीन 25 हजार रुपये, बेकिंग ओव्हन 3 लाख रुपये, कंटेनर 17 हजार रुपये, ट्रे 5 हजार रुपये, कच्चा माल सुमारे 50 हजार रुपये, कारखाना सेटअपसाठी सुमारे 50 हजार रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा खर्च येईल आणि खेळते भांडवल एक लाख रुपये पकडून हा संपूर्ण व्यवसाय सहा लाख रुपयांमध्ये सुरू होऊ शकतो. या व्यवसायासाठी इतर व्यवसायाप्रमाणेच बँकेकडून कर्ज घेतले जाऊ शकते. किंवा मुद्रा लोन योजनेअंतर्गत देखील तुम्ही कर्ज घेऊ शकता.

किती कमाई होऊ शकते

या व्यवसायातून दरमहा 60 ते 70 हजार रुपये कमाई होऊ शकते. म्हणजेच एका वर्षाचा विचार केला असता 7 लाख रुपयांपासून ते साडेआठ लाख रुपयांपर्यंतची कमाई या व्यवसायातून होऊ शकते.

तथापि कमाईचा हा सर्व आकडा तुमच्या सेलिंगवर अवलंबून राहणार आहे. जर तुम्ही चांगले उत्पादन बनवले त्याची योग्य तऱ्हेने विक्री केली तर तुम्हाला हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. विशेष म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड बनवून यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता.