तुमचे पॅन कार्ड हरवले आहे का? तर करा आता ई- पॅन कार्ड डाउनलोड फक्त 2 मिनीटात; इथे बघा स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया

ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे

  •   तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) जाऊन झटपट ई-पॅनवर क्लिक करावे लागेल.
  •   यानंतर e-PAN पेज उघडेल, येथे तुम्ही Get New e-PAN चा पर्याय निवडा.
  •   आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि चेक बॉक्स चिन्हांकित करा आणि पुढे जा वर क्लिक करा.
  •   आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मिळालेला OTP टाकावा लागेल.
  •   यानंतर तुम्हाला चेक बॉक्स पुन्हा चिन्हांकित करावे लागेल आणि पुढे जा निवडा.
  •   आता तुम्हाला UIDAI सोबत आधार तपशील सत्यापित करावा लागेल आणि चेक बॉक्स चिन्हांकित करावे लागेल.
  •   पुढे जा निवडल्यानंतर, तुम्हाला पोचपावती क्रमांक दाखवला जाईल.
  •   आता तुम्हाला पेजवर View e-PAN आणि Download e-PAN चा पर्याय दिसेल.
  •   डाउनलोड पर्याय निवडून तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.