राज्य सरकारचा मोठा निर्णय.! इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरणार आता ह्या वेळेवर

नमस्कार मित्रांनो राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी एका भाषणात राज्यपालांनी शाळेचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर शालेय शिक्षणमंत्र्यांनी विचार करत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सरकारने एक निर्णय घेतला आहे.

पूर्वी प्राथमिक शाळा सकाळी सात वाजता सुरू होत होत्या. यामुळे विद्यार्थ्यांना झोप लागली नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत होता. त्यामुळेच आता सरकारने अधिकृत निर्णय घेतला आहे.

मुलांना झोपायला जास्त वेळ लागतो. राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ६५ हजारांहून अधिक सार्वजनिक शाळांमध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आणि खाजगी अशा एकूण 1,10,114 शाळा आहेत.

शासनाच्या जीआरमध्ये मध्ये काय सांगितले?

राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येतात.

आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.

पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.

सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.

मोसमी हवामान, विशेषता हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात.

सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते,

सकाळी लवकर भरणान्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्याथ्यर्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.

 

👉👉 हे ही बघा : 10वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये निघणार 30 हजार पेक्षा जास्त जागांसाठी मोठी भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज👈👈

Leave a Comment