तुमच्या घराचे करा स्वप्न पूर्ण, बांधकाम स्टीलचे झाले दर कमी, इथे जाणून घ्या नवीन दर

नमस्कार मित्रांनो लग्न बघावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे. कारण, लग्न आणि घर या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वप्न सत्यात उतरवणे असंच असते. त्यामुळेच, घर बांधताना सध्या बाजार भावात बांधकाम वस्तूंची, साहित्यांची किंमत किती आहे. या वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊन माणूस घर बांधायला सुरुवात करतो. सध्या आपण घराचे बांधकाम काढले असेल तर, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, बांधकामासाठी लागलेल्या स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

 

👉👉 हे ही वाचा : लेकीच्या भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली का? सरकारने सुरू केली ही नवीन योजना, इथे करा ऑनलाईन अर्ज👈👈

 

सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय नागरिकांचे आयुष्यच जणू या गोष्टींसाठी खर्ची होते. कारण, मुलांची लग्न आणि घराचं बांधकाम हेच काय आयुष्याचं गणित असतं. म्हणून, घर बांधताना माणूस स्वस्त महाग या बाबींचा विचार करतो. मात्र, युक्रेन- रशिया युद्धजन्य परिस्थिती गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महागले होते. बांधकाम स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापाऱ्यांनी स्टॉक करणंही बंद केलं होतं. तर, या किमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे केली होती.

 

👉 इथे क्लिक करून बघा सिमेंटचे व स्टीलचे नवीन दर 👈

Leave a Comment