तुमच्या घराचे करा स्वप्न पूर्ण, बांधकाम स्टीलचे झाले दर कमी, इथे जाणून घ्या नवीन दर

स्टील झाले स्वस्त

तीन वर्षांपूर्वी लोखंडाच्या किमतीत दिवसाला १०० ते २०० रुपयांची वाढ होत होती. गेल्यावर्षी मात्र एक दिवसात १ ते १ हजार रुपयांची चढ- उतार होत गेली. गेल्या काही दिवसांत ३ हजार रुपयांनी दर कमी झाले होते. गेल्यावर्षी कोरोना आणि तेजी मंदीमुळे लोखंड विक्रीच्या व्यवसायात ४० टक्केच खरेदी झाली होती. यंदाचे वर्ष मात्र चांगले गेले. गेल्या महिन्यात ६२ रुपयांवर आलेले स्टील सध्या ५५ रुपयांवर आले आहे.

 

स्टीलची मागणी घटली

मे आणि जून महिन्यात सर्वाधिक लोखंड विकले जाते. कारण पावसाळ्यासह हिवाळ्यात ग्रामीण भागात शेतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या दिवसात बांधकाम ठप्प होते. त्यानुसार काही दिवसांपासून मागणी घटली आहे. त्या कारणामुळेही स्टीलचे दर घसरले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

सध्या जळगावच्या बाजारात सिमेंटचे दर ३२० ते ३५० रुपयांवर प्रतिबॅग आहेत. यापूर्वी ३१० ते ३४० पर्यंतचा दर होता. या दरात चढउतार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

महिन्यात बांधकाम स्टील म्हणजे सळयांची किंमत जवळपास ७० हजार रुपये प्रति टन म्हणजे ७० रुपये किलो होती. मात्र, मे महिन्यात या किमतीत

घट झाली असून एप्रिल महिन्यात ७० रुपये किलो असलेले स्टील मे महिन्यात ६१ हजार ५०० रुपये टनांवर पोहोचले होते. म्हणजेच, बाजारात ६१-

मागणीसह दरही वाढणार हिवाळा आणि उन्हाळ्यात बांधकामांचे प्रमाण वाढते. त्यामुळे या दिवसात लोखंडाची मागणी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे स्टीलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, आणि तसे झाल्यास बांधकाम करणायांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.

 

बांधकामांना वाळूचा अडसर

गेल्या महिन्यापासून स्टील स्वस्त झाले आहे. परंतु, जिल्ह्यासह शहरात वाळू उपलब्ध नसल्याने अनेकांनी बांधकाम थांबविले आहे. कारण सध्या वाळू गटावरून उपसा बंद आहे. तसेच चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूमाफियांचेही हातपाय बांधले गेले आहेत. तर शासकीय योजनांसह कामांसाठी जिल्हा प्रशासनाने जप्त केलेली वाळू विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. खासगी बांधकामासाठी मर्यादा असल्याने अनेकांची वाळूअभावी कोंडी होत आहे.