आत्ता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे झाले अधिक सोपे, मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईन झाले सुरु

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana : असा करा ऑनलाईन अर्ज

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी mahacmmrf.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा प्रस्ताव मांडल्यानंतर पडताळणी करून तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल.

 

वैद्यकीय सहायता निधी संबधी मदतीसाठी

+918650567567

मदतीसाठी वरील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या

महाराष्ट्र शासन – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यत निधी अर्ज

महाराष्ट्र शासन – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी Online अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण सूचना :

डिस्चार्ज झालेल्या/उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा.

रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / आयुष्यामान भारत / राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम/ धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

अर्जात दर्शविलेली माहितीशी संबंधित कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जदाराने स्व साक्षांकित (Self Attest) करून सोबत जोडणे अनिवार्य आहे.

संशयास्पद अथवा खोटी/बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरेल.